पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट

Last Modified गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (12:12 IST)
पुरुषांनी रडू नये, पुरुषांनी रडणे म्हणजे तो दुर्बल, कमजोर असल्याचं समजलं जातं. परंतू माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ही गोष्ट मान्य नाही. पुरुषाने रडणे काहीही गैर नाही, आपले अश्रू दाखवणे म्हणजे कोणतीही शरमेची गोष्ट नाही, असं स्पष्ट मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं आहे.

'जागतिक पुरुष आठवडा' निमित्त सचिनने एक भावूक केली सचिनने सोशल मीडियावर एक खुले लिहूले असून म्हटले आहे की पुरुषांनी रडू नये, तो रडणं म्हणजे कमजोर असल्याचा समज समाजात आहे. हा समज बदलायला हवा. अश्रूंना मोकळी वाट करून देणे यात गैर काय. उलट या गोष्टीमुळे व्यक्ती मजबूत होता.

लहानपणापासून पुरुषांनी रडू नये, रडल्यामुळे पुरुष कमजोर बनतात असे शिकवले जाते. मी सुद्धा हीच समज बाळगून मोठा झालो. मात्र, माझी समज चुकीची होती.

रडणं ही कमजोर असल्याचे प्रतीत नसून आपलं दु:ख दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी मोठ्या हिंमतीची आवश्यकता असते. यामुळे तुम्ही एक अधिक चांगली व्यक्ती बनू शकता. पुरुषांनी काय करावे आणि काय करू नये या मानसिकेतून बाहेर पडावे असंही सचिनने म्हटले.
सचिनने पत्रात म्हटले की तुम्ही लवकरच पती, वडील, भाऊ, मित्र, मार्गदर्शक आणि शिक्षक व्हाल. तुम्हाला इतरांसाठी उदाहरण बनावं लागेल. तुम्हाला मजबूत आणि साहसी व्हावं लागेल. पण, तुमच्या आयुष्यात असेही काही क्षण येतील जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, शंका आणि संकटांचा अनुभव होईल. अशी वेळही येईल जेव्हा तुम्ही अयशस्वी व्हाल आणि तुम्हाला रडायची इच्छा होईल. पण, अशावेळी नक्कीच तुम्ही तुमच्या अश्रूंना थांबवाल आणि स्वत:ला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत कराल, कारण पुरुष हेच करतात. पुरुषांना हीच शिकवण देण्यात आली आहे की, पुरुष कधीही रडत नाही. रडल्याने व्यक्ती कमकुवत होतो.
सचिनने म्हटले की, मी माझ्या आयुष्यात 16 नोव्हेंबर 2013 ही तारीख कधीही विसरु शकत नाही. त्या दिवशी मी अखरेच्या वेळी पवेलिअनकडे परत जात होतो माझा कंठ दाटून आला होता आणि माझ्या डोळ्यातून अश्रू जगासमोर आले पण आश्चर्य म्हणजे मला त्यानंतर शांत वाटतं होतं. मला मजबूत असल्याची जाणीव झाली.











To the Men of Today, and Tomorrow! #shavingstereotypes

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

सचिनने म्हटले की या रुढीवादी विचारांच्या पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

संघात समतोल असण्यावर दिला भर

संघात समतोल असण्यावर दिला भर
न्यूझीलंड विरुध्दच्या मालिकेत यश मिळविणसाठी भारतीय संघ समतोल ठेवण्यावर भर दिला असल्याचे ...

कंगना विराटला म्हणे ‘पंगों का सरताज’

कंगना विराटला म्हणे ‘पंगों का सरताज’
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ...

आता टी-20 विश्वचषक जिंकणे हाच ध्यास

आता टी-20 विश्वचषक जिंकणे हाच ध्यास
ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार्‍या आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकणे हाच भारतीय क्रिकेट ...

न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा

न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा
न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयकडून वनडे आणि टी-20 या ...

भारताने कांगारूंविरुध्दची स्वाभिानाची लढाई जिंकली : शोएब ...

भारताने कांगारूंविरुध्दची स्वाभिानाची लढाई जिंकली : शोएब अख्तर
भारताने ऑस्ट्रेलिाविरुध्दची मालिका 2-1 ने जिंकली. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाची ...