शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (15:19 IST)

मग महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी आयोजन केलंय का? :मनसे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रा मध्ये आयपीएल चे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच?? असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे. महाराष्ट्रात आयपीएलचे सामने आयोजित करण्यात आले पंरतु याचा फायदा स्थानिकांना होत नाही आहे. तर मग महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी आयोजन केलंय का? असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
 
दरम्यान संदीप देशपांडे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र सराकरने पुढाकार घेतला होता. पर्यटन खात्याने पुढाकार घेतला होता. जर महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवले तर त्यातून अर्थचक्र फिरेल, कुठलं अर्थचक्र फिरतय? जर इथलं लोकल वाहतूकीचे कंत्राट दिल्ली आणि युपीतल्या लोकांना मिळत असेल. जर इथे आयपीएलमुळे ज्या गोष्टी तयार होतात त्याची कामे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न मिळता बाहेरच्या लोकांना मिळत असेल तर कुठलं अर्थचक्र फिरवण्याची आपण भाषा करतो आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते अर्थचक्र फिरणार मग काय स्वतःचे अर्थचक्र फिरण्यासाठी सामने भरवले आहेत की, महाराष्ट्राचे अर्थचक्र फिरवायला सामने भरवले आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.