मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:43 IST)

वीरूचे पुन्हा एकदा मजेशीर ट्विट

virendra shehwag twit

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आकारहीन पोळ्यातून ही आनंद घेत असेल कोणाला पटणार नाही. सेहवागने आकार नसलेल्या पोळ्यांचा फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.  तो अनेकदा मजेशीर ट्विट करुन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. बुधवारी त्याने असेच एक मेजदार ट्विच करत सर्वांचे लक्ष वेधले.

सेहवागने हाताच्या पंजाच्या आकाराच्या दोन पोळ्यांचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याने बायकोला हातची पोळी करुन मागितल्यानंतर नव्या नवरीने अशी पोळी तयार केली, असे मजेशीर कॅप्शन विरुने या ट्विटला दिले आहे. या ट्विटरवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे एका नेटकऱ्याने या पोळ्या अनुष्काने तर केल्या नाहीत ना? असा प्रश्न उपस्थितीत करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.