सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , बुधवार, 3 मार्च 2021 (14:57 IST)

आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाचे स्थान घसरले

भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना मंगळवारी जाहीर केलेल्या आयसीसी महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत दोन स्थानांनी घसरून सहाव्या स्थानी पोहोचली आहे. तर झूलन गोस्वामी गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी कायम आहे.
 
अनुभवी खेळाडू मिताली राज 687 गुणांसह नवव्या स्थानी आहे, ती फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये सामील झालेली दुसरी भारतीय फलंदाज आहे. स्मृतीचे 732 गुण आहेत.
 
इंग्लंडची सलामीवीर टॉमी ब्युमोंट न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेत 2-1 ने विजय संपादित केल्याने पाच स्थानांची उंच उडी घेत अव्वलस्थानी पोहोचली आहे. टॉमीने वेस्ट इंडीजच्या स्टेफनी टेलर व न्यूझीलंडच्या ऐमी सेटरथवाइटसारख्या  खेळाडूंना पिछाडीवर सोडले व दुसर्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लेनिंगवर 16 गुणांची आघाडी घेतली.
 
झूलन (691), पूनम यादव (679), शिखा पांडे (675) आणि दीप्ती शर्मा (639) गोलंदाजांच्या यादीत अव्वल दहामध्ये सामील आहेत. हे सर्व खेळाडू आपल्या मागील स्थानावर कायम आहेत. ऑस्ट्रेलियाची जेस जोनासन 804 गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. तित्यानंतर तिच्याच देशाची मेगान शूट (735) हिचा नंबर येतो.
अष्टपैलूंच्या यादीत दीप्ती 359 गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे. तर  ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी अव्वल स्थानीच आहे.