1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (09:11 IST)

बॉल टॅम्परिंग प्रकरण : तीन खेळाडू दोषी

steve smith
केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी पूर्ण झाली.  यामध्ये संपूर्ण संघ नाही, तर तीनच खेळाडू यामध्ये दोषी आढळले आहेत. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी मागितली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. तर डॅरेन लिमन यांना या षडयंत्राची कल्पना नसल्याचं आढळल्यामुळे ते प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट ऐवजी मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स यांची जोहान्सबर्गमधील चौथ्या कसोटीसाठी संघात वर्णी लागली आहे. टिम पेनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होते. त्यानंतर स्मिथने
 याची कबुलीही देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केले होते.