रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (09:25 IST)

मिताली राजच्या नावावर 'हा' नवीन विक्रम

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कर्णधार मिताली राज यांनी सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे
 
सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या मिताली राज जगातील पहिल्या क्रिकेटपटू बनल्या आहेत. 12 फेब्रुवारीला मिताली राज यांनी न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळून 22 वर्षे 231 दिवसांची कारकिर्द पूर्ण केली.
 
यापूर्वी पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. सचिनची वनडे कारकिर्द 22 वर्षे 91 दिवसांची आहे. आता सचिनच्या नावावर पुरुष क्रिकेट टीमचा विक्रम आहे.
 
तर महिला क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम आता मितालीच्या नावावर आहे.