testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

उपुल थरंगाकडे श्रीलंकेचे नेतृत्व

upul
नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:21 IST)
भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व अनुभवी आक्रमक फलंदाज उपुल थरंगा याच्याकडे सोपविण्यात आले आहे. वास्तविक पाहता नुकतीच संपलेली कसोटी मालिका थरंगासाठी निराशाजनक ठरली होती. त्याला सहा डावांमध्ये केवळ 88 धावा करता आल्या होत्या. परंतु एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्याकडे पहिल्यांदाच कर्णधारपद देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे.
भारताने कसोटी मालिका 3-0 अशी जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. तसेच दोन वर्षांपूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने 5-0 अशी बाजी मारली होती. त्यामुळेच भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका हे खडतर आव्हान असून त्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन उपुल थरंगाने आपल्या देशबांधवांना केले आहे.

प्रत्येक संघ कधीतरी “बॅड पॅच’मधून जात असतो, असे सांगून थरंगा म्हणाला की, देशाचे प्रतिनिधित्व करताना आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांनाही अभिमान वाटत असतो. तसेच आम्हालाही पराभव आवडत नाही. परंतु खेळ म्हटला की जय-पराजय हे दोन्ही चालायचेच याची जाणीव देशबांधवांनी ठेवली पाहिजे.
श्रीलंकेचा संघ – उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, चमारा कपुगेदरा, मिलिंद सिरिवर्धना, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चमीरा व विश्‍वा फर्नांडो.


यावर अधिक वाचा :