Widgets Magazine

हार्दिक पंड्याच्या कसोटीत पदार्पणाबाबत विराटने दिले संकेत

गॉल| Last Modified बुधवार, 26 जुलै 2017 (09:26 IST)
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या कसोटीत पदार्पण करणार असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. पंड्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकते असे विराटने म्हटले आहे.
आमच्याकडे हार्दिक पंड्यासारखा क्रिकेटपटू ज्यात विकेट घेण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे संघात समतोल साधला जाणर असल्याचेही विराट म्हणाला. नियमित सलामीवीरांच्या अनुपस्थिती रोहितला सलामीची संधी मिळणार का असे विचारले असता, रोहित शर्माने आतापर्यंत कधीही कसोटीत सलामीवीराची भूमिका बजावलेली नाही. तसेच पहिल्या कसोटीत हा प्रयोग आम्ही करणार नाही कारण आमच्याकडे स्पेशल सलामी फलंदाज आहे आणि तोच खेळाची सुरुवात करेल असे त्याने म्हटले.


यावर अधिक वाचा :