गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (17:18 IST)

झहीर खानचे आयपीएलमध्ये पुनरागमन, मोठी जबाबदारी दिली

zaheer khan
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी सर्व फ्रँचायझींनी आधीच तयारी सुरू केली आहे. मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय खेळाडू रिटेनशनचे नियम जाहीर करेल याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचे दीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे.

व्यावसायिक क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यांनंतर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालकपद भूषवणारा झहीर आता आगामी मोसमात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडणार आहे.
 
IPL 2025 पूर्वी या वर्षाच्या अखेरीस एक मेगा लिलाव होणार आहे. याआधी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह हा अनुभवी गोलंदाज दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतला आहे. यापूर्वी  झहीर  मुंबई इंडियन्सचा भाग होता.
आता ते टीम मेन्टरची भूमिका साकारणार आहे. त्याची घोषणा आज होणार आहे. 

झहीरने  मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या तीन आयपीएल संघांसाठी खेळले आहे. झहीरने आयपीएलच्या 10 आवृत्त्यांमध्ये या संघांसाठी 100 सामने खेळले आणि 7.58 च्या इकॉनॉमी रेटने 102 विकेट घेतल्या. ते  शेवटचा 2017 मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसले होते, जेव्हा ते दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधार होते.
Edited by - Priya Dixit