शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: डर्बन , गुरूवार, 18 ऑक्टोबर 2012 (12:46 IST)

केकेआर चॅम्पियन्स लीग मधून बाहेर

FILE
आयपीएल विजेता कोलकाता नाइट रायडर्स संघ चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर बुधवारचा पर्थ स्कॉचर्सविरूद्धचा सामना पावसामुळे स्थगित झाला.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना बुधवारचा सामना जिंकणे आवश्यक होते. नाणेफेक होण्याअगोदरही पाऊस झाला होता. हे लक्षात घेता गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाज घेतली. केकेआर संघाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा
निर्णय बरोबर ठरवताना पर्थ स्कॉचर्सच्या फलंदाजांना बांधून ठेवले. मात्र पावसाचा जोर वाढल्याने सामना स्थगित करणे भाग पडले आणि केकेआरच्या आशा वाहून गेल्या.