शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

गेलच्या खात्यावर 600 षटकार

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 लीगमध्ये खेळत असलेल्या कॅरेबियन ख्रिस गेलने नवा विक्रम आपल्या नावे केला. टी-20 क्रिकेटमध्ये 600 षटकांर व 600 चौकारा मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. गेल सध्या बिग बॅशमध्ये मेलबोर्न रेनीगेड्सकडून खेळत आहे.
 
डावखुऱया गेलच्या नावे टी-20 क्रिकेटमध्ये 600 षटकाराचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. वैयक्तिक चौकार लगावण्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉज (664) अव्वलस्थानी आहे. गेलच्या नावे 653 चौकार असून न्यूझीलंडचा कर्णधार मेकॉलम (605) तिसऱया स्थानावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 600 षटकार व 600 चौकार लगावणारा एकमेव खेळाडू आहे. त्याचा सहकारी पोलार्ड 388 षटकारासह दुसऱया स्थानी तर मेकॉलम 290 षटकारासह तिसऱया स्थानी आहे. गेलच्या नावे टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.