शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नेपियर , सोमवार, 30 मार्च 2009 (15:17 IST)

द्रविडनंतर गंभीर दुसरी भिंत: सेहवाग

न्यूझीलंडविरुध्द दुसर्‍या कसोटी सामन्यात विषम परिस्थितीत शतक करणार गौतम गंभीर हा राहुल द्रविडनंतर भारताची दुसरी भिंत आहे, असे कौतुक प्रभारी कर्णधार वीरेंद्र सेहवाग याने केले.

गंभीर आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु जेव्हा भारतासमोर फॉलोऑननंतर सामना वाचविण्याची परिस्थिती आली तेव्हा गंभीर 11 तास क्रिजवर होता. गंभीरने आपल्या खेळात लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. त्याच्यातही द्रविडप्रमाणे सामना वाचविण्याची क्षमता आहे.