शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2016 (09:49 IST)

प्रणवचा 1009 धावांचा विश्वविक्रम

मुंबई: क्रिकेट जगतात प्रणव धनावडेने विश्वविक्रम रचला आहे. आंतरशालेय क्रिकेटमध्ये कल्याणच्या प्रणवने एकट्याने नाबाद 1009 धावा ठोकल्या आहेत. एकाच सामन्यात 1 हजार धावा करणारा प्रणव जगातला पहिला फलंदाज ठरला आहे.
 
के.सी. गांधी शाळेकडून खेळणाऱ्या प्रणवने आर्य गुरूकुलविरोधात 323 चेंडूत नाबाद 1009 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने तब्बल 59 सिक्सर आणि 129 चौकार ठोकले.
 
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह धनंजय मुंडे, अजित पवार, मनसेकडूनही प्रणववर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.