शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलंबो , मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (16:57 IST)

भारताने श्रीलंकेत 117 धावांनी जिंकली कसोटी मालिका

भारत आणि श्रीलंकेत कसोटी मालिकेच्या शेवटच्या आणि निर्णायक टेस्टमध्ये भारताने श्रीलंकेला 117 धावांनी पराभूत करून तीन कसोटी सामन्यात 2-1ने आपल्या नावावर करून घेतली. श्रीलंकेला जिंकण्यासाठी 385 धावा काढण्याचे आव्हान मिळाले होते, पण पाचव्या दिवशी त्याचे सर्व फलंदाज 268 धावा काढून बाद झाले. कर्णधार अँजलो मॅथ्यूजने (११०) जोरदार लढत दिल्यानंतरही भारताने तिस-या कसोटीत श्रीलंकेला ११७ धावांनी नमवून तब्बल २२ वर्षांनी श्रीलंकेत कसोटी मालिका (२-१) जिंकली आहे.  
 
भारताच्या ३८६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सर्व गडी २६८ धावांत बाद झाले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशातील प्रथम मालिका विजय नोंदवला आहे. पहिल्या डावात पुजाराची १४५ धावांची शानदार खेळी, इशांत शर्माने कसोटीत टिपलेले २०० बळी आणि श्रीलंकेचा कर्णधार अँजलो मॅथ्यूचे (११०) शतक यामुळे ही तिसरी कसोटी यादगार ठरली. 'मॅन ऑफ दि मॅच'चा पुरस्कार चेतेश्वर पुजाराला तर या मालिकेत एकूण २१ बळी टिपणा-या आर. अश्विनला 'मॅन ऑफ दि सीरिज'चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.