शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: दुबई , शनिवार, 19 एप्रिल 2014 (13:20 IST)

मुंबई इंडियन्स विराटला रोखणार का?

येथे दुपारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि माजी विजेता मुंबई इंडियन्स या संघात आयपीएल स्पर्धेतील महत्त्वपूर्ण असा साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे. 
 
या स्पर्धेत मुंबई संघाला सलामीसच कोलकाता संघाकडून पराभव पत्करावा लागला. मुंबईचे प्रमुख फलंदाज केरॉन पोलार्ड आणि कोरी अँडरसन हे दोघेही फिरकीवर साफ अपयशी ठरले. त्यामुळे मुंबईला 41 धावांनी परावभ पत्कारावा लागला. याउलट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजयी सलामर देत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा तब्बल 8 गडी राखून पराभव केला. 
 
बंगळुरूच संघात विराट कोहली, ख्रिस गेल, युवराजसिंग असे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. युवराज आणि विराट या दोघांनीही जबरदस्त अशी फलंदाजी केली. त्यामुळे बंगळुरू संघाला सहज विजय मिळविता आला. कोहली व युवराजने तिसर्‍या जोडीस नाबाद 86 धावांची भर घातली. त्यामुळे  मुंबईला या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान राहणार आहे. 
 
मुंबई संघाची भीस्त कर्णधार रोहित शर्मा आणि अंबाटी राडू यांच्यावर राहणार आहे. मुंबईकडे प्रभावी असे गोलंदाज नाहीत. मिशेल जॉनसनची जागा घेणारा कोरी अँडरसन हा खर्चीच गोलंदाज ठरला आहे. प्रग्यान ओझा आणि युवराजसिंग हे आता चालू शकत नाहीत, अशी स्थिती आली आहे. त्यामुळे  मुंबईला जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. 
 
ख्रिस गेल हा पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. मुंबईविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही, हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. बंगळुरूकडे अल्बी मोरकेल, मिशेल स्टार्क, वरूण एरॉन, लेगस्पिनर जुवेंदर चहाल, अशोक डिंडा, युवराजसिंग असे गोलंदाज आहेत. मुंबईला या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे बनले आहे. 
 
मुंबई संघाला फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही सुधारणा करावी लागेल. लशित मलिंगाने कालीसचा महत्त्वपूर्ण झेल सोडल्यामुळे मुंबईला फटका बसला. त्याचप्रमाणे कालीस आणि मनीष पांडे यांची भागीदारी फोडण्यासाठी मुंबईच्या सहा गोलंदाजांना घाम गाळावा लागला. त्यामुळे मुंबईपुढे विराटला रोखण्याचे कठीण आव्हान राहणार आहे.
 
प्रतिस्पर्धी संघ : 
 
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, केरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, अंबाटी राडू, माईक हसी, झहीर खान, प्रगन ओझा, कोरी अँडरसन, जोस हेजलवूड, सी. एम. गौतम, आदित्य तारे, अपूर्व वानखेडे, मर्चट डी लांगे, कृष्णकुमार संतोकी, बेन डंक, पवन सुयाल, सुशांत मराठे, जसप्रीत बुमरा, श्रेयस गोपाळ, जलाज सक्सेना.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, ए.बी.डीव्हिलिअर्स (यष्टीरक्षक), युवराजसिंग, मिशेल स्टार्क, वरुण एरॉन, अल्बी मॉरकेल, निक मडीन्सन, विजय झोल, तन्मय मिश्र, यजुवेंद्र चहाल, पार्थिव पटेल, योगेश ताकवले, शादाब जकाती, अशोक डिंडा, रवी रामपॉल, हर्षल पटेल, अबू मेचीम, सचिन राणा, संदीप वारियर.
 
शनिवार : 19 एपिल्र 2014
 
दुबई : दुपारी 4 वाजता.
 
रॉल चॅलेंजर्स बंगळुरू x मुंबई इंडियन्स