शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (10:11 IST)

रोहित शर्माचं मोदींना आग्रहाचं निमंत्रण

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेऊन आपल्या लग्नाचं खास आग्रहाचं निमंत्रण दिलं. 
 
13 डिसेंबर रोजी रोहित आणि त्याची प्रेयसी रितिका सजदेह हे लग्नबंधनात अडकणार आहेत. काही महिन्यापूर्वीच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या आणि अंतिम कसोटीसाठी भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला आहे. 
 
याचवेळी रोहित शर्माने मोदींची भेट घेऊन त्यांना लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. या आधी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंगने आपल्या लग्नाचे निमंत्रण पंतप्रधान मोदींना दिलं होतं. हरभजनच्या निमंत्रणाचा मान ठेवीत पंतप्रधान मोदींनी दिल्लीत झालेल्या रिसेप्शन पार्टीलाही हजेरी लावली होती.