शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नेपियर , सोमवार, 30 मार्च 2009 (18:04 IST)

सामना हरण्याची भीती नव्हती: सेहवाग

भारतीय फलंदाज इतक्या लवकरच हार मानणारे नव्हते. यामुळे भारतीय संघाला फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना हरण्याची भीती नव्हती, असे प्रभारी कर्णधार वीरेंद्र सेहवाग याने सांगितले.

सेहवागने सांगितले की, पहिल्या डावात भारतीय फलंदाजी घसरली. यामुळे न्यूझीलंडला 314 धावांची आघाडी मिळाली. परंतु सामना वाचविण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास होता. आम्ही अडीच दिवसही फलंदाजी करु शकतो. लक्ष्मण, द्रविड, गंभीर आणि सचिनसारखे खेळाडू दोन दिवस खेळून काढू शकतात.