testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दुधाचे अतिसेवन हानिकारक

Last Modified शुक्रवार, 10 एप्रिल 2015 (15:13 IST)
दुधाचे सेवन आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. दुधातील ड जीवनसत्त्व हाडे मजबूत करण्यात मदत करते. मात्र स्वीडनमधील संशोधकांनी एक अहवालात याच्या अगदी उलट निष्कर्ष काढला आहे. त्यांच्यानुसार, दिवसातून तीन ग्लासापेक्षा दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते.
उप्पसाला विद्यापीठाचे प्राध्यापक कार्ल मिशेलसन यां‍नी सांगितले की, दुधाऐवजी दही आणि चीज जास्त फायदेशीर ठरू शकते. अर्थात हे प्राथमिक विश्लेषण असून त्यावर अजून सखोल अध्ययन केले जात आहे.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, या अध्ययनात जास्त दूध पिणार्‍या लोकांच्या आरोग्यावर नजर ठेवली असता, त्यांच्यात अवेळी मृत्यूची शक्यता जास्त प्रमाणात दिसून आली. सोबतच त्यांच्या हाडांमध्ये ड जीवनसत्त्वामुळे येणारी कणखरताही दिसून आली आहे. गेल्या काही वर्षांत दुधामुळे होणार्‍या फायद्यांमध्ये घसरण दिसून आली.


यावर अधिक वाचा :