बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

येथे आहे 1100 वर्ष जुनं सासू सुनेचं मंदिर

आपण सर्व देवी देवतांचे मंदिर बघितले असतील परंतू सासू सुनेच्या मंदिराबद्दल कधी ऐकले आहे का? होय खरंय या मंदिराबद्दल जाणून घेतल्यानंतर आपण देखील हैराण व्हाल. हे मंदिर राजस्थानच्या उदयपूर येथे स्थित आहे. आणि या मंदिराची कहाणी अत्यंत रोचक आहे. 
 
सास बहू अश्या नावाने प्रसिद्ध हे ऐतिहासिक मंदिर पर्यटन स्थल आहे. सुनेचं मंदिर सासूच्या मंदिराच्या तुलनेत जरा लहान आहे. 10 व्या शतकात निर्मित हे मंदिर अष्टकोणीय आठ नक्षीदार महिलांनी सजवलेली गच्ची आहे. मंदिराच्या भिंती रामायणाच्या विभिन्न प्रसंगांनी सजवलेल्या आहेत. मुरत्या एकमेकांच्या सभोवती ठेवण्यात आल्या आहे.
 
सासू-सुनेच्या या मंदिरात एक मंचावर त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश चित्रित केले गेले आहे आणि दुसर्‍या मंचावर राम, बलराम आणि परशुराम यांचे चित्र लागले आहेत. मेवाड राजघराण्यातील राजमातेने येथे प्रभू विष्णूंचे मंदिर आणि सुनेनं शेषनाग मंदिर निर्मित करवले होते. सासू आणि सुनेनं हे मंदिर निर्मित केले म्हणून मंदिराचं नाव सासू सुनेचं मंदिर असे पडले असावे.
 
1100 वर्षापूर्वी या मंदिराचे निर्माण राजा महीपाल आणि रत्नपाल यांनी करवले होते. या मंदिराच्या प्रवेश-द्वाराच्या बाल्कनीवर महाभारताची पूर्ण कथा अंकित आहे, जेव्हाकि या जवळीक स्तंभावर महादेव आणि पार्वती यांच्या मुरत्या आहे. तसेच आता दोन्ही मंदिराच्या गर्भगृहातील देवांच्या मुरत्या गायब आहेत.
 
या मंदिरात प्रभू विष्णूंची 32 मीटर उंच आणि 22 मीटर रुंद अशी शंभर भुजा असलेली मुरती आहे. म्हणूनच हे मंदिर सहस्त्रबाहु मंदिर नावाने देखील ओळखलं जातं. दोन्ही मंदिराच्या मध्यभागी ब्रह्मांचे लहानसे मंदिर देखील आहे.
 
असे म्हणतात की मुगलकाळात हे मंदिर बंद करण्यात आले होते आणि ब्रिटिशांनी दुर्गवर ताबा घेतल्यावर मंदिर पुन्हा उघडले गेले.