शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

म्हणून अंतराळवीर दारू पिऊ शकत नाही

पृथ्वीपासून हजारो मैलावर असलेल्या अंतराळात राहणे किती तणावाचे असू शकते... हा तणाव दूर करण्यासाठी अंतराळवीर थोडी फार दारू घेऊ शकत नाही का? याचं उत्तर नाही... का नाही त्यामागील कारण आम्ही येथे आपल्याला सांगू इच्छित आहोत.
 
नियम म्हणून सरकारी संस्थांनी अंतराळवीरांना दारू पिण्यास मनाई केली आहे. अधिक उंचीवर दारूचे सेवन केल्यास अधिक नशा चढते असादेखील समज आहे. उड्डाणावेळी दारू प्यायल्यास अधिक नश येते का? याचे उत्तर थिंक-ड्रिंक या परिणामाशी जोडले गेले 
 
आहे. अधिक उंचावर असल्यावर दारू घेतल्याने ‍अधिक नशा येते असे ज्यांना वाटते त्यांना थिंक ड्रिंक मुळे ही असे वाटू शकते.
 
इतकेच नव्हे तर माउथवॉश, परफ्यूम सारख्या वस्तूंमध्ये अल्कोहेल असल्याने अंतराळवीरांना या वस्तू नेण्यासही मनाई आहे. अशा वस्तू किंवा बीअरमुळे स्पेस स्टेशनला नुकसान होण्याचा धोका आहे. दुसरे म्हणजे ज बाबदारीचाही मुद्दा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या 
 
विमानाचा पायलट उड्डाणाच्या वेळी दारू घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे हाच नियम अंतराळात 17,200 मैल प्रति तास वेगाने प्रवास करणार्‍या अंतराळवीरांना लागू होता. इतकंच नव्हे तर उड्डाण घेण्याच्या 12 तास आधी दारू पिण्यास मनाई आहे.