शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या गावाची सर्व जमीन देवाच्या नावावर, घरांना दारं नाही

राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात देवमाली नावाचे एक अद्भुत गाव आहे. अंधश्रद्धा म्हणा वा अंधविश्वास पण या गावात सर्व घरे मातीची आहेत. म्हणजे या गावात पक्के घर बांधण्याची ऐपत असलेले धनी लोकही कच्च्या मातीचीच घरे बांधतात कारण या गावात पक्के घर बांधले तर गावावर संकटे येतात व ते घर आपोआपच कोसळते असे अनुभव घेतले आहेत. त्यामुळे हे एका खेड्याप्रमाणेच राहिले आहे.
या गावात देवनारायणाचे मंदिर आहे. हा विष्णूचा अवतार समजला जातो व गावातील सर्व जमीन या देवाच्या नावावर आहे. म्हणजे गावातील कुणाही ग्रामस्थाच्या नावावर जमिनीचा छोटा तुकडाही नाही. गेल्या 50 वर्षांत या गावात एकही चोरी झालेली नाही व येथील घरांना दरवाजे नाहीत तशीच कुलपेही नाहीत. गावातील समस्त लोक शाकाहारी आहेत.
 
इतकेच नव्हे तर गावात लग्न असले तरी नवर्‍याला घोड्यावरून मिरवले जात नाही. असे केले तर गावावर संकटे येतात असे ज्येष्ठ लोक सांगतात. या गावाचे नागरिक स्वत:ला एका पूर्वजाचे वंशज मानतात. गावात न सांगताच दारूबंदी पाळली जाते म्हणजे कुणीही दारूला स्पर्शही करत नाहीत. पूर्वजांनी वसविलेल्या या गावात लोक आनंदाने व समाधानाने राहत आहेत.