बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (14:14 IST)

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक ?

घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. 
त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. 
त्यातील एकाने साधूला विचारलं, "साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. 
पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?"
साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले. 
साधू : "तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?"
पत्रकार : "येस !! का हो ?"
साधू :  "घरी कोण कोण असत?"
आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं.
कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.
तरी मूळ प्रश्नाचे "उत्तर" मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला. 
तो म्हणाला : "माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण !
सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत."
साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?"
(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.)
साधू : "तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?"
पत्रकाराने राग आवरत सांगितलं : "बहुतेक एक महिना झाला असावा.
साधू : "तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ?
एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?"
(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)
तरी त्याने उत्तर दिले : "गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो"
साधू : "त्यावेळी किती दिवस एकत्र होता?"
पत्रकार (हळवा होत) : "तीन दिवस होतो"
साधू : "तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?"
(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.)
साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?"
वडिलांना विचारलं का ? की कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?"
(असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).
साधू : "बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको.
तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते. 
तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही Connection नाहीय. 
You are not connected to him. आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी "लगावं" असणं वेगळं. कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते. 
 
एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं... हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही...
 
तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही.
आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं. 
एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला. 
वरील घटनेतील "साधू" म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी विवेकानंद होते.

- सोशल मीडिया