testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

छोट्या रुग्णांनी तयार केला पारंपरिक किल्ला

diwali kiaa
Last Updated: बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (09:50 IST)
आजच्या काळात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध आहे; सध्याची खेळणीसुद्धा स्मार्ट झाली आहेत. आज असा काळ आहे, जेव्हा मुलांना मैदानावर खेळायला जा म्हणून सागावे लागते आणि अभ्यासेतर खेळ म्हणजे कम्प्युटर गेम, इंटरनेट सर्फिंग असा अर्थ झाला आहे. अशा या काळात बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील २०० हून अधिक मुले त्यांच्या खोलीतून बाहेरपडून सर्वांनी मिळून मातीचा किल्ला तयार केला. पश्चिम भारतातील या भागात दिवाळीत किल्ला तयार करण्याची अत्यंत जुनी परंपरा आहे.
या किल्ले निर्मितीमध्ये सहभागी झालेली सर्व मुले ५ ते १४ या वयोगटातील होती. या मुलांनी प्रथमच अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला होता. त्या लहान मुलांनी चिखलात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटून किल्ला तयार केला. त्यावर पणत्या लावल्या. यातून सर्व मुलांचे भविष्य उज्ज्वल असेल अशी आशा या कृतीमधून व्यक्त केली. या सोहळ्याचा भाग म्हणून मुलांना भेटवस्तू व मिठाईचे वाटप करण्यात आले. चिखलात खेळणे म्हणजे मातीशी नाते जोडणे. सध्याच्या पिढीमध्ये हे हरवत चालले आहे. तसेच या अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून परंपरा व शांततापूर्वक सेलिब्रेशनमधील दरी हॉस्पिटलने भरून काढण्याचा प्रयत्न केला.

"महाराष्ट्रात ३५० हून अधिक किल्लेअसून त्यांना मराठी साम्राज्याचा वैभवशाली वारसा लाभला आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही मुलांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देत आहोत. तसेचमातीने किल्ला तयार करण्याची ही कला मुलांना अवगत व्हावी यासाठी प्रोत्साहन देत आहोत. किल्ला तयार करताना आणि मातीत खेळताना मुलांना खूप आनंद झाला होता.",असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या.

मुलांना हाताने मातीचा किल्ला तयार करण्यास सांगणे हा त्यांना अर्थपूर्ण छंदाची ओळख करून देण्याचा मार्ग होता. या माध्यमातून या लहानग्यांमध्ये एक सांघिक भावना विकसित होते. त्याचप्रमाणे मुले इतरांना प्रोत्साहन देण्यास,समस्येवर समाधान शोधण्यास,पर्यायी मटेरिअलचा वापर करून कृती करण्याचा मार्ग निवडण्यास शिकतात. मुलांना विविध किल्ल्यांची रचना समजून त्यांच्याशी निवडीत कथासुद्धा समजतात.


यावर अधिक वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या

national news
गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. चार महानगरांमध्ये गेल्या १० ...

शिष्यवृत्ती परीक्षा : प्रथमच उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी ...

national news
प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारीला होत आहे. यावेळी ...

दोन मुली आणि पत्नीला विष देऊन व्यावसायिकाची आत्महत्या

national news
पुण्यातील शिवणे येथील निलेश चौधरी या व्यवसायिकाने दोन मुलींना आणि पत्नीला विष दिले. तसेच ...

टकल्यांचा मानसन्मान ठेवणारे जपानी रेस्टॉरंट

national news
टकले लोक आपल्या छप्पर उडालेल्या रुपामुळे नेहमीच परेशान असतात. कारण त्यांचे टक्कल सतत ...

वेद हे वास्तुशास्त्राचे उगस्थान आहे

national news
प्राचीन वेदांमध्ये स्थापत् वेद म्हणून उल्लेख आढळतो, म्हणजे वेद हे वास्तुशास्त्राचे उगम ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...