शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

त्याच्या पोटातून काढला चक्क बल्ब

सऊदी अरेबियातील एक 21 वर्षीय तरूण मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्या पोटात खूप दुखत असून वेदना असह्य झाल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्याला रूग्णालयात भरती करणे योग्य समजले. डॉक्टरांनी त्याची अवस्था बघून त्याला लगेचच इमरजन्सी बॉर्डमध्ये हलवले. तसेच त्याच्यावर लगेच शस्त्रक्रिया केल्यावर एक अजब प्रकार समोर आला.
 
शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याच्या पोटातून चक्क लाईटचा बल्ब काढला. त्यामुळेच त्याला त्रास होत होता. या 21 वर्षीय तरूणावर दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याच्या पोटातून बल्ब बाहेर काढण्यात आला. आता त्याची प्रकृती ठीक आहे. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याच्या पोटात बल्ब गेला कसा? तर जास्त विचार करू नका कारण आम्ही याचाही खुलासा करणार आहोत.
 
हा तरूण 10 वर्षांचा असताना त्याने बल्ब गिळला होता. तेव्हापासून त्याच्या पोटात हा बल्ब होता. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याने आता तो बरा आहे.