शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

अधिक पॉर्न पाहणार्‍यांवर गुगलची नजर

आपल्या जवळच्यांसाठी गुपचूप भेटवस्तू घेणे किंवा इतरांना विचारताना ओशाळल्यासारखे वाटणार्‍या गोष्टींची माहिती मिळवणे सोपे व्हावे, या उद्देशाने गुगलने सुरू केलेली इनकॉग्निटो विंडोचा उपयोग मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहण्यासाठी केला जातो. होय, गुगल क्रोमच्या इनकॉग्निटो विंडोमार्फत सहज पॉर्न बघता येते व आपण काय पाहिले, याचा पुरावाही लॅपटॉप किंवा फोनमध्ये राहत नाही.
परंतु आता ही विंडो जास्त प्रमाणात वापरणार्‍यांच्या सक्रीनच्या कोपर्‍यात डोळे मिचकावणारी स्माईली दिसेल. तुम्ही शंभर टॅब उघडले तरी ही स्माईली दिसतच राहील. इनकॉग्निटो मोड वापरल्यास गुगलचा हसरा चेहरा डोळे मिचकावून चिडवणार्‍या चेहर्‍यात रूपांतरित होईल.