testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘मी अगेन्स्ट दी मुंबई अंडरवर्ल्ड’... इसाक बागवान यांची शौर्यगाथा इंग्रजीत

book cover
Last Modified मंगळवार, 3 जुलै 2018 (11:21 IST)
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार प्रकाशन

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ॲड. उज्ज्वल निकम राहणार उपस्थित

मध्य मुंबई आणि पोलीसांवर दहशत माजवणारा खतरनाक गुंड मन्या सुर्वेचा कर्दनकाळ ठरलेले, १९८० च्या दशकातील बडा राजन, हाजी मस्तान, पठाण गँग, दाऊद गँग, पोत्या - अमर नाईक - अरूण गवळी टोळी, ड्रग्ज किंग आगा खानसारख्या आणि इतर समाजविघातक शक्तींना वेसण घालणारे जिगरबाज पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या ‘Me Against the Mumbai Underworld’ ह्या शौर्यगाथेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. गुरूवारी ५ जूलै रोजी मुंबईच्या रंगशारदा नाट्यगृहात प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, खा. संजय राऊत, पोलीस महानिरीक्षक कैसर खालीद, अभिनेता रझा मुराद, निवृत्त पोलीस सहआयुक्त मधुकर झेंडे आदी मान्यवर ह्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
bhagwan
११ जून १९८२ रोजी पोलीस इतिहासातील (मन्या सुर्वेच्या) पहिल्या एन्काऊंटरमुळे नावारूपास आलेले ते 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात एन.एस.जी कमांडो येईपर्यंत नरीमन हाऊसचा किल्ला यशस्वीरित्या लढविणारे निवृत्त सहआयुक्त इसाक बागवान. ३५ वर्षांच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक रोमांचकारी गुन्ह्यांचा लावलेला छडा, अनेक अप्रकाशित घटना आणि रहस्यमय किस्से ‘Me Against the Mumbai Underworld’ ह्या पुस्तकात वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. त्याकाळी आतासारखी संपर्क साधने नसतानाही केवळ खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे थेट गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर छापे मारून रक्ताला चटावलेल्या अनेक खतरनाक गुंडांच्या मुसक्या आवळण्यात इसाक बागवान यांचा हातखंडा होता.
तीन वेळा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळविणारे इसाक बागवान हे स्वत: अनेकवेळा गुन्हेगारी टोळ्यांच्या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. पोलीस उपनिरिक्षक ते सहायक आयुक्त ह्या प्रवासात केवळ धाडसी पोलीस अधिकारी म्हणून नाही तर खाकी वर्दितील सहृदयी माणूस अनेक घटनांमधून पोलीस दलाने आणि समाजाने अनुभवला आहे. अशा ह्या कर्तबगार इसाक बागवान यांची शौर्यगाथा प्रत्येक भारतीय नागरीकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा

national news
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘तेलुगू देसम’च्या खासदारांनी दाखल केलेला ...

विराटचे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम

national news
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल ...

सोने-चांदीच्या दरात घसरण

national news
गेल्या चार दिवसात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याला दरात 600 ते 800 रुपयांची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

पहिल्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

national news
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी भारतीय ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...