शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2017 (07:46 IST)

पहिल्यादाच नाट्य ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला

आठव्या नाट्य ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला प्रथमच मिळाले आहे. १७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०१८ या काळात देशातील पंधरा शहरांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ठ पाचशे नाट्य कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे.
 
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) सोसायटीचे अध्यक्ष व ख्यातनाम रंगकर्मी रतन थिय्यम आणि एनएसडीचे संचालक व प्रख्यात दिग्दर्शक डॉ. वामन केंद्रे यांनी ही घोषणा केली. १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये या नाट्य ऑलिम्पिकचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. मुंबई येथे होणार्‍या ८ एप्रिलच्या समारोपाला देशाचे नवे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. या नाट्य ऑलिम्‍पिकसाठी केंद्राने सुमारे अडीचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे.