इंदिरा गांधी यांचा राजकारणातला प्रवास
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला. आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
माहिती व नभोवाणी मंत्री: जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.