1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (13:34 IST)

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाची सुरवात कशी झाली जाणून घ्या

दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिन आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ज्येष्ठांचा सन्मान दररोज, प्रत्येक क्षण आपल्या मनात असावा, परंतु त्यांच्या प्रती आपल्या मनात असलेल्या आदराला व्यक्त करण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांना प्रतिबिंबित करण्यासाठी, औपचारिकरीत्या एक दिवस निश्चित केला गेला आहे.
 
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याची सुरुवात वर्ष 1990 मध्ये केली गेली. जगात वृद्धांवर होणारे गैर वर्तन आणि अन्यायाला रोखण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 14 डिसेंबर 1990 ला हे निर्णय घेण्यात आले की दर वर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जाणार आणि 1 ऑक्टोबर 1991 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला गेला.
 
या अगोदर देखील वृद्धांसाठी काळजी करतं त्यांच्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. वर्ष 1982 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने 'वृद्धावस्था को सुखी बनाइए' (वृद्धावस्था आनंदी करा) चा नारा देऊन 'सबके लिए स्वास्थ्य' (सर्वांसाठी आरोग्य) मोहीम सुरु केली. या नंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ दिनाच्या आरंभ केल्या नंतर 1999 ला 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक वर्षाच्या रूपात साजरे केले जाते.
 
हा दिवस संपूर्ण पणे ज्येष्ठांना समर्पित करण्यात आला आहे. वृद्धाश्रमात त्यांच्यासाठी बऱ्याच प्रकाराचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचा आनंदाची आणि आदराची काळजी घेतली जाते. विशेषतः त्यांचा सोयीचा आणि समस्यांचा विचार केला जातो, आणि त्यांचा आरोग्याकडे गंभीरतेने जातीने लक्ष दिले जाते. 
 
ज्येष्ठमंडळी आपल्यासाठी ईश्वराचे अवतार असतात, ज्यांचा आशीर्वादामुळे आपले पालन होतात, आपल्या मनात त्यांचा प्रति प्रेम आणि आदर असणं स्वाभाविक आहे. परंतु त्यातूनही अधिक महत्वाचे आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना साथ देणं जेव्हा ते असहाय्य आणि अक्षम असतात. हेच त्यांचा बद्दल आपले खरे प्रेम आणि खरी श्रद्धा आहे.
 
 जरी हे समयाभावे नेहमी शक्य नसल्यास, एका दिवशी आपण त्यांबद्दल जेवढे शक्य असल्यास निष्ठावान असायला पाहिजे. कारण त्यांना प्रेमाशिवाय काहीही नको. 
 
आपल्या सर्वांचें हे कर्तव्य आहे की आपण अशी वेळच येऊ देऊ नये की हा दिवस त्यांना वृद्धाश्रमात साजरा करावा लागेल. म्हणून प्रत्येक नागरिकांचे हे कर्तव्य आहे की ते आपल्या घराच्या वडिलधाऱ्यांची आणि ज्येष्ठांची काळजी घ्यावी आणि त्याचा सांभाळ चांगल्या प्रकारे करावा.