शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (14:23 IST)

#COUPLE CHALLENGE या नविन ट्रेंडच्या नावाखाली सायबर गुन्हा होण्याची शक्यता, तर सावधान !

आपण मॉर्फींग (morphing) चे शिकार होऊ शकतात ?
सध्या फेसबुक(facebook)या सोशल साईटवर गेल्या २ दिवसापासुन एक नविन ट्रेंड सुरुं झाला आहे. यामध्ये मोठया प्रमाणामध्ये तरुंण वर्ग व इतर नागरिक हे आपल्या स्वतःचे व आपल्या #पत्नीचे एकत्र काढलेले फोटो फेसबुक या सोशल साईटवर अपलोड करीत आहेत आणि त्या फोटोवर #COUPLE_CHALLENGE असे ट्रेंड लिहून ते व्हायरल करीत आहे. या ट्रेंडची क्रेझ मोठया प्रमाणात वाढत असल्याने प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळंया पध्दतीने 
उदा. #couple challenge, #family challenge, #single challenge, #khaki challenge, 
 
#daughter challenge असे वेगवेगळें ट्रेंड चे नाव टाईप करुंन आपले स्वतःचे व आपल्या परीवाराचे फोटो अपलोड करुंन फेसबुक सोशल साईटवरुंन व्हायरल करुं लागले आहेत. यामुळें सायबर गुन्हेगारांना आपण स्वतःच आपले फोटो देत आहोत. जेणेकरुंन सायबर गुन्हेगार हे फेसबुक या सोशल साईट वर #couple challenge नाव सर्च केले असता लाखो व्यक्तींचे फोटो त्यांना सहजासहजी भेटत आहेत. 
 
त्यामुळें काही सायबर गुन्हेगार आपल्या #पत्नीचे किंवा #मुलीचे फोटो मॉर्फ (एडीट) करुंन त्याठिकाणी अश्लिल फोटो एडीट करुंन आपल्याला मॉर्फ केलेला फोटो पाठवुन आपल्यास ब्लॅकमेल करुं शकतात. किंवा काही सायबर गुन्हेगार हे मॉर्फ (morphing)केलेले फोटो सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देवून आपल्याला पैशाची मागणी करुंन आपली फसवणुक करुं शकतात. त्यामुळें अशा नविन येणारे ट्रेंड पासुन आपण योग्य ती दक्षता घ्यावी. जेणेकरुंन आपल्या वैयकि फोटो चा सायबर गुन्हेगार गैरवापर करुंन आपल्याला मानसिक, शारिरीक, व आर्थिक नुकसान पोहचवु शकतो. व आपली बदनामी देखील करुं शकतो.