रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (12:58 IST)

आयटीएम आयडीएम ने केले डिझाइन अँड मीडियाच्या नवीन कॅम्पस चे उदघाटन

आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूशन्सने मुंबई मध्ये डिझाइन आणि मीडिया चे नवीन कॅम्पसचे उदघाटन केले. या नवीन कॅम्पस चे उदघाटन मुख्य पाहुण्या, सुप्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता आणि आयटीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. रामाणा व श्री. नितिन पुचा सीईओ आयटीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स यांनी केले. या नवीन कॅम्पसच्या ब्रँड अँबेसेडर मसाबा गुप्ता असून त्या विद्यार्थाना सृजनशील आणि रचनात्मकत  डिझायन निर्मितीसाठी तसेच डिझाईनिंग क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
यासंदर्भात बोलताना आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स चे सीईओ श्री. नितीन पुचा म्हणाले कि, " मसाबा गुप्ता यांच्याशी भेटून आम्हाला खूप आनंद झाला आणि शिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य माहिती दिली, तसेच डिझाइनिंगच्या क्षेत्रात भविष्यातील करिअर बद्दल मार्गदर्शन केले. मसाबा गुप्ता एक बहुआयामी डिझायनर आहेत आणि त्यांच्या मदतीने आमचे उद्दिष्ट प्राप्त करण्यास खूप मदत होईल.  आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूशन्स हा नवीन कॅम्पस सुरू करण्यास उत्सुक आहेत आणि विद्यार्थ्यांना डिझाइनर बनण्याची इच्छा असलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट डिझाइनर बनविण्यास आम्ही तितकेच उत्सुक आहोत."
 
आईटीएम आयडीएमशी संबंधित असलेल्या विषयावर टिप्पणी करताना मसाबा गुप्ता म्हणाल्या कि, "आयटीएम इन्स्टिटयूट ऑफ डिझाईन अॅण्ड मीडियाशी संबंधित असल्याचा मला आनंद होत आहे. माझा असा विश्वास आहे की रचनात्मकता डिझाइनिंगमध्ये मोठी भूमिका बजावते आणि विद्यार्थ्यांना योग्य माहिती, इंटेलिजन्स मिळणे आवश्यक आहे.
संस्थेचे उद्दीष्ट डिझाइन शिक्षण आणि नवीन क्षेत्राचे नेतृत्व करणे, पर्यावरणीय आणि सामाजिक जबाबदार नागरिक तयार करणे जे सकारात्मकरित्या जगावर प्रभाव पडू शकतात. मसाबा गुप्ता, श्री. स्टीफन मास्करेनहास, अकॅडमी डायरेक्टर, प्राइम फोकस अकॅडमी, प्रीती खोदे, संचालक, आयटीएम आयडीएम, सोनाली ब्रिड, सीनियर फॅकल्टी, फॅशन डिझाईन, आयटीएम आयडीएम, एमएस यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रीती सोमन, सीनियर फॅकल्टी आणि इंटीरियर डिझाइन एक्सपर्ट आणि दिव्या बिंद्रा, सीनियर फॅकल्टी, व्हिज्युअल कम्युनिकेशन, आयटीएम आयडीएम यांनी या उदघाटन आणि डिझाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते.