सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चविष्ट आणि औषधी देशी कोंबडी कडकनाथ

इतर कोंबडीच्या मासापेक्षा कडकनाथ नावाने ओळखल्याने जाणार्‍या देशी कोंबडीचा मास अधिक चविष्ट आणि औषधी असतो. या कोंबडीचा रंग व रक्ताचा रंग तसेच स्नायूदेखील काळ्या रंगाचे असतात. संपूर्ण शरीर काळे म्हणून या कोंबडीला कालामासीही म्हणतात.
 
यात प्रथिने, लोह यांचे प्रमाण जास्त आढळते. तसेच मास कामोत्तेजक असते. यात हानिकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी असते.
 
वर्षाकाठी या कोंबड्या 100 ते 120 अंडी देतात मात्र खाद्याच्या पोषकतेवर हे प्रमाण वाढू शकते. तसेच अंड्यांच्या वरील भागात कॅल्शियम तर पिवळ्या बलकामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, मेद यांचे प्रमाण आढळते.