गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (17:41 IST)

Video: कुत्र्याने अशी विकेटकिपिंग केली की, सोशल मीडियावर खळबळ

master blaster sachin tendulkar
सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कुत्रा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा ज्या पद्धतीने चेंडू पकडताना दिसत आहे ते पाहून सचिनही हैराण झाला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना विचारले आहे, तुम्ही याला काय नाव द्याल? या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ साडेसात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर चाहतेही यावर सातत्याने प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
 
व्हिडिओ शेअर करताना सचिन तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला हा व्हिडीओ एका मित्राने फॉरवर्ड केला. हे पाहिल्यानंतर, मला असे म्हणायचे आहे की, हे जोरात पडणारे बॉल पकडण्याचं कौशल्य आहे. आपण क्रिकेटमध्ये अप्रतिम यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक आणि अष्टपैलू खेळाडू पाहिले आहेत. पण तुम्हाला काय नाव द्यायला आवडेल? चला तर मग पाहूया हा मजेदार व्हिडिओ. 
https://twitter.com/i/status/1462751426279477248