Widgets Magazine

मोलोसिया या देशात राहतात केवळ 33 लोक

molosia
Last Modified बुधवार, 19 जुलै 2017 (17:49 IST)
जगात अनेक छोट्या आकाराचे व आहेत. मात्र, मोलोसिया एक देश अनोखाच आहे. या देशाची लोकसंख्या केवळ 33 असून त्यामध्ये चार कुत्र्यांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या नेवाडामध्ये हा देश आहे.
या देशाची स्वत:ची परंपरा, चलन आणि कायदे आहेत. या स्वयंघोषित देशाचे नाव मोलोसिया आहे. 1977 मध्ये केवीन बॉघ आणि त्याच्या एका मित्राला आपला स्वतंत्र देश असावा, असे मनात आले. दोघांनी मिळून मोलोसियाची स्थापना केली. त्यावेळेपासून केवीन या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांची पत्नी अथार्तच फस्टे लेडी आहे. या देशात राहणारे बहुतांश लोक त्याचे नातेवाईक आहेत. अर्थात जगातील एकाही देशाने या देशाला मान्यता दिलेली नाही. या ठिकाणी एक स्टोअर, ग्रंथालय, कब्रस्थान तसेच अन्य काही ठिकाणे आहेत.


यावर अधिक वाचा :