सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (12:05 IST)

श्री कृष्णाने मयूर पंख माथ्यावर धारण केले कारण...

वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्री रामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा तेथे एक मयुर तेथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे. चला मी आपणास दाखवतो. पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहचाल. 

आपणास माहिती आहे की मयूर पंख, हॆ एक विशेष काळी व एक विशेष ऋतु मध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छे विरूद्ध पंख निघत असतील ही त्याचा मृत्यु होतो. आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभुची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही. 
 
तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूर पंख इच्छेविरूद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेल. माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करुन वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले.

तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे. आपण तर अनेक ऋणानुबंधानात अडकलेलो आहोत. ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील. अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे. कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहिती नाही आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते....
 
एक महत्त्वाचे - पूर्वीच्या ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून परतफेड करतात त्यामुळे मी सरळमार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधीच खंत करु नका.
 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात-
मना त्वाची रे पूर्वसंचित केले 
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले
देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु चरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतो.
 
- सोशल मीडिया