शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (12:19 IST)

750 रुपये किंमतीची पाणीपुरी

दिल्लीतल्या एका तरुणाने पाणीपुरीचे एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यात या पाणीपुरीची किंमत 750 रुपये असल्याचे त्याने म्हटले आहे. आता ही किंमत वाचनू तुम्हालाही धक्का बसला असेल. तुमच्या डोक्यात एव्हाना आकडेमोडही सुरू झाली असेल. 750 रुपयांत किमान 35 प्लेट तरी पाणीपुरी खाईन, असे तुम्ही ही किंमत वाचून मनातल्या मनात म्हटले असेल, पण जेव्हा आम्ही तुम्हाला पुढची गोष्‍टी सांगू तेव्हा तुम्हाला आणखी एक धक्का  बसेल, तो म्हणजे असा की या 750 रुपयांत 35 प्लेट तर सोडाच पण साध्या 35 पाणीपुरीही खाणार्‍याच्या वाट्याला येत नाही.