testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पिंपळपान

Last Modified बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (12:36 IST)
खरं तर तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला या पिंपळपानाविषीय उत्सुकता असतेच! या पिंपळपानावर कैकजनांचे इतके प्रेम असते की ते आपल्या वहीत-पुस्तकात किंवा रोजनिशीत कित्येक दिवस जपूनही ठेवतात! आयुष्याच्या पहिल्या कोवळ्या वाटेवरचं पहिलं-वहिलं कोवळं पिंपळपान अगदी जिवाशी नातं जोडणारं असतं!
पिंपळ हा कल्पवृक्ष असून तो प्रत्येकाला काही ना काही तरी देतच असतो! एखाद्या घरातल कर्त्या पुरुषासमान!... आणि तो भासतोही तसाच. याचा आणि शाळेचा काय त्या देवानं रेशमी धागा जोडला कुणास ठाऊक पण.. हा अगदी

भूमिपूजनापासून त्या शाळेच्या आवारात न सांगता येतो! याला कोणी निरोप देत नाही की याची कोणाला आठवण होत नाही. पण ... हा तेथे हजर होतो! कधी मला याला 'निलट'च म्हणावसं वाटतं!... किंवा गेल्या जन्मीचा एखादा पिसाटलेला शिक्षक.....!
दगडांवर घाव घालून, शाळेची इमारत बांधली जाते ती यच्याच छायेत बसून! दमलेल्या कामगारांना हाच थंड वारा घालतो! संस्थापकानेसुद्धा पहिला वर्ग जमविलेला मी कित्येक वेळा याच कल्पवृक्षाच्या छायेत पाहिलाय! हे पिंपळपान पण कोणत्याही कामगाराच्या किंवा संस्थापकाच्या लक्षात राहात नाही..! हेमंत-शिशिराचा थंडावा सोसून, अंगाला पुन्हा पांतस्थासाठी वसंतास स्वतःला सोपवून मोकळा होतो तो पिंपळच! वटवृक्षासारखा हा ब्रह्म जरी नसला तरी शांत-निर्मळ पालनकर्त्या विष्णूसारखा नक्कीच आहे.

याचा रंग सुवर्णाला सुद्धा चोरता यावा एवढा हा शांत! याच हसण्याने मोर घाबरतो म्हणे... आश्चर्य आहे..! पण याच्याच वाळलेल्या पिंपळपानावर पाय पडताच त्याला ताल धरता येतो हे तितकेच सत्य आहे! हे पिंपळपान त्या मोराच्या

लक्षात कसे काय राहात नाही...!

आच कॉलेजच्या आवारात एक भला मोठा पिंपळवृक्ष होता. तो अतिशय विशाल असल्याने तो वृद्ध भासत होता. माला कोणी जन्म दिला किंवा याचा कोणत्या सरांनी सांभाळ केला हे महत्त्वाचे नसून तो आम्हाला काय काय द्यायचा हेच महत्त्वपूर्ण आहे! पिण्याच्या पाण्याची टाकी याच्याच थंड छायेत तृषितांना तृप्त करत होती. ती पण गर्वाने फुगलेली.. हा मात्र तसाच निश्चिंत. हा मात्र कधी त्या अहंकारी टाकीवर रागवला नाही. उलट तिला शांत ठेवणसाठी, थंड होणसाठी आपल्या सहस्र हातांनी तिला आच्छादितच ठेवत राहिला!

तित्या उदरात आपल्या पानांनाही कधी पडू देत नसे! पणतिला कुठे राहिली आठवण, त्या पिंपळपानांची..

अं.. ! हे असंच असतं. आपल्या घरातल्या कर्त्यापुषाचं! हं... असंच असतं.. असो, हे पिंपळपान कधी कधी त्या

भीष्मासारखे वाटते; अजीव-अभंग आणि नवजीवन देणारे, प्रत्येक क्षणाला!
विठ्ठल जोशी


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

नारायण राणे यांचा बंडाचा पवित्रा

national news
युती झाल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी ...

मी आणि सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रद पवार यांनीच अजित, रोहित, पार्थ यापैकी कोणीही लोकसभा ...

पुलवामा हल्ला आम्हीच केला

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पुलवामा ...

नोव्हाक जोकोविच ठरला “सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’

national news
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने कयलीन एम्बाप्पे, इलियुद किपचोगे आणि लेब्रोन ...

'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले : भुजबळ

national news
शिवसेना भाजप युती म्हणजे 'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले असल्याची टीका ...