रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

अबब... 75 वर्षांपासून फक्त वार्‍यावर जिवंत आहे बाबा...(व्हिडिओ)

कोणी व्यक्ती आहार आणि पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो का? ते ही 75 वर्षांपर्यंत! निश्चित या प्रश्नाचे उत्तर नाही असेच असेल परंतू गुजरातमध्ये एका बाबा असे आहेत, ज्याने 75 वर्षांपासून काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही. आज या व्यक्तीचे वय 86 असून ते शारीरिक रूपाने पूर्णपणे स्वस्थ आहे. गरज पडली तर काही किलोमीटर पायीदेखील चालू शकतात.
 
हे व्यक्ती आहे संत प्रहलाद जानी. हे आपल्या अनुयायींमध्ये बाबा जानी आणि माताजी या नावाने प्रसिद्ध आहे. बाबा जानी गुजरातच्या अंबाजी मंदिराजवळ एक गुहेत राहतात. त्यांचा दावा आहे की ते 75 वर्षांपासून काहीही न खाता-पिता जिवंत आणि स्वस्थ आहे.
13 ऑगस्ट 1929 साली मेहसाणा जिल्ह्याच्या चारदा गावात जन्मलेले बाबा सांगतात की त्यांनी वयाच्या सातव्या वर्षीच घर सोडून दिले होते आणि वयाच्या 11 व्या वर्षी संन्यासी बनून गेले होते. त्याच्याप्रमाणे त्यांना दुर्गा देवीचा वरदान आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा मी सात वर्षाचा होतो, काही साधू माझ्याजवळ आले. त्यांनी मला आपल्यासोबत चलण्याचा आग्रह केला तेव्हा मी नकार दिला. या घटनेच्या सहा महिन्यानंतर देवीसारख्या तीन मुली (दुर्गा, लक्ष्मी और सरस्वती)  माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझ्या जिभेवर बोट ठेवले. तेव्हापासून मला भूक आणि तहान भासत नाही.
 
बाबा जानी म्हणाले की ते अनेकदा जंगलात 100-200 किमी पर्यंत पायी जातात, तरीही त्यांना भूक आणि तहान भासत नाही. बाबांचा हा दावा तपासण्यासाठी 30 डॉक्टरांची टीम स्थापित केली गेली, ज्यांनी अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये किमान 15 दिवसापर्यंत त्यांच्यावर नजर ठेवली. 2010 साली साधू प्रहलाद जानी यांच्यावर 3 कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्यांच्यावर 24 तास नजर ठेवण्यात आली होती, परंतू यात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. डॉक्टरही हैराण आहे की त्यांना जिवंत राहण्यासाठी एनर्जी कुठून प्राप्त होते.
 
अहमदाबादचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह यांनी सांगितले की त्यांचा शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. त्यांना नकळत बाहेरून शक्ती प्राप्त होते. त्यांना आहार किंवा कॅलरीजची गरज पडत नाही. आम्ही अनेक दिवस त्यांचे अवलोकन केले, एक-एक सेकंदाचा व्हिडिओ घेतला, ते काहीही खायले- प्यायले नाही, आणि मलमूत्र त्यागदेखील केला नाही.
 
पांढरी लांब दाढी असलेले हे बाब जानी महिलांप्रमाणे शृंगार करतात. लाल साडी घालतात आणि नाकात नथही. त्यांचा परिधान देवी अंबाजीसारखा असतो. म्हणून भक्त त्यांना माताजी या नावानेदेखील हाक मारतात आणि त्यांची आरतीही करतात.