1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 20 जून 2025 (10:56 IST)

Rajmata Jijau Punyatithi 2025: राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

rajmata jijau
राजमाता जिजाऊ माँ साहेबांना
पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन
 
स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या
राजमाता जिजाऊ
माँ साहेब यांना पुण्यतिथी दिनी
कोटी कोटी वंदन आणि मानाचा मुजरा
 
जिजाऊची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा
स्वराज्या प्रेरिक राजमाता
राजमाता जिजाऊ माँ साहेबांना मानाचा मुजरा
 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या
पुण्यतिथी दिनी मानाचा मुजरा!
 
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा
 
धन्य ती माता जिजाबाई
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज
धन्य धन्य ते स्वराज...
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
 
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन् शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हाला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ
 
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला,
साक्षात् होती ती आई भवानी,
जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
 
इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा,
झुकवूनी मस्तक करशील,
जिजाऊंना मानाचा मुजरा.
 
मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा,
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने,
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
 
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे,
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
 
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईंना आदरांजली !