शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

वारंवार सेल्फी घेणार्‍यांनो सावधान!

सध्या सेल्फीचे वेड प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आहे. चार मित्र किंवा मैत्रिणी भेटले की, लगेच सेल्फी घेतला जातो. एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जरी गेले किंवा मित्राच्या वाढदिवसाची पार्टी असली तरीही हमखास सेल्फी घेतला जातो. इतकेच काय ट्रेकिंगवेळीही सेल्फी काढण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. पण तुम्हाला वारंवार सेल्फी घेण्याची हौस असेल तर सावधान. कारण हे एखाद्या मानसिक रोगाचे लक्षणही असू शकते. एम्स रुग्णालयाच्या मते दिवसभरात वारंवार सेल्फी घेण्याने माणूस आत्मकेंद्री होतो. तसेच किशोरवयीन आणि तरुणवर्गासाठी हा सर्वात घातक रोग आहे.
 
सेल्फीचे धोके : डॉक्टरांच्या मते, सेल्फीमुळे लोक आत्मकेंद्री बनतात. तसेच स्वत:ला सुंदर दाखवण्याच्या प्रयत्नात तुम्ही एखाद्या कृत्रिम जगात वावरु लागता. शिवाय तुमच्या कामावर आणि शिकण्याच क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. यातून तुम्ही स्वत:ला नैराश्येच्या गर्तेत ढकलले जाता. विशेष म्हणजे या सर्वामुळे तुमच्या सामाजिक वागणुकीवरही परिणाम होतो. 
 
तेव्हा सेल्फीला समाजमान्यता असली तरी वारंवार सेल्फी घेण्याची सवय मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करते.