शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चित्त्याला मारून खाल्ले वाघाने

वाघ, चित्त्याला मारून खाऊ शकतो. भारताच्या नॅशनल पार्कमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर ही गोष्ट पूर्ण दुनियेला माहीत पडली.
 
शरीरावर काळ डाग असलेला चित्ता खूप लबाड आणि चपल शिकारी मानला गेला आहे. झाडावर आरामात चढता येतो म्हणून तो सुरक्षित असतो. परंतू त्याच क्षेत्रात पराक्रमी आणि वेगवान वाघ पण असला तर चित्त्याला सावध राहावं लागतं. काही वर्षांपूर्वी भारताच्या रणथंबौर नॅशनल पार्कमध्ये पहिल्यांदा या दोन मोठ्या मांजरींना संघर्ष करताना बघितले गेले.
वन्य जीव तज्ज्ञ तेव्हा हैराण झाले जेव्हा वाघाने चित्त्याचा शिकार केला आणि त्याला खायला सुरुवात केली. अशातली ही पहिली घटना होती जेव्हा ‍दुनियेला हे कळले की वाघ चित्ता खातो.
 
यानंतर वाघ आणि चित्त्याच्या संघर्षाचे आणखी काही व्हिडिओ आले. हे व्हिडिओ भारताच्या सरिस्का टायगर रिझर्वचे आहे. वाघांसाठी प्रसिद्ध सरिस्का येथे चित्ताचा सामना एका वाघाशी झाला. काही सेकंद संघर्ष चालला. नंतर वाघाच्या शक्तीपुढे चित्त्याने दम सोडला.
 
असमच्या जंगलात शिकार सीमित असल्यामुळे वाघाला आपल्या क्षेत्रात दुसरा शिकारी सहन होत नाही. परंतू झाडावर चढण्याच्या कौशल्यामुळे चित्ता त्याच क्षेत्रात सक्रिय असतो आणि संधी मिळाल्यावर लहान जनावरांना आपला शिकार बनवतो. चित्ता वाघापासून दुरी ठेवण्याच्या प्रयत्नात असतो परंतू सामना झालाच तर वाचण्याची संधी गमावून बसतो.