Widgets Magazine
Widgets Magazine

लग्नाच्या बंधनात अडकत नाही लावणी नृत्यांगना

मला एक दिवस आपल्या 12 वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांबद्दल सांगावं लागणार. ती आता सातवीत शिकते. तिला हे ही सांगावं लागणार की तिचा जन्म पार्टनरसोबत राहण्यामुळे झाला असून आमचे लग्न झालेले नाही.
lavani
आमच्या समजात एकदा पायात घुंघरू बांधले की आपण आजीवन विवाह बंधनात अडकू शकत नाही. आपण संबंध बनवू शकता, बरोबर राहू शकता परंतू विवाह करू शकत नाही. मलाही संसार थाटायला आवडले असते पण जे पूर्ण होऊ शकत नाही असे स्वप्न बघून तरी काय होणार.
 
32 वर्षीय नर्तकी जी महाराष्ट्रात अनेक जागी फिरून लावणी प्रस्तुत करते ही तिच्या हृदयातील व्यथा आहे. लावणी नर्तकींमध्ये अशी परंपरा आहे की त्यांना आजीवन एकटं जीवन काढावं लागतं. यातून अनेकांचे पार्टनर असतात आणि मुलंही असतात. त्यांची बदनामी व्हायला नको म्हणून ते या परंपरेबद्दल गुपित बाळगून असतात. या स्त्रिया लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात पण विवाहात अडकल्या तर ते लोकनृत्याकडे दुर्लक्ष करतील आणि ही परंपरा संपेल.
 
एक राष्ट्रीय स्तराची लावणी नर्तकीदेखील या विषयावर बोलणे टाळत असून आपल्या रिलेशन आणि अपत्यांबद्दल स्पष्टपणे काही सांगत नाही. यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवणारे आणि पुस्तक संगीत बारी लिहिणारे भूषण कोरगांवकर यांचे म्हणणे आहे की लावणी डांसर्समधून अधिकश्या भातु कोल्हाटी जातीच्या असतात. जी 100 वर्षांपूर्वी भटक्या जात होती. ज्यात आजही मातृसत्तात्मक पद्धतीने जीवन यापण होतं.
 
ते सांगतात, विवाह न करता जन्माला आलेल्या अपत्याला आईचे उपनाम लावण्यात येतं आणि अत्यावश्यक वाटले तर कोणत्याही पुरुषी नावा मिडिलनेम म्हणून लिहिले जातं.
lavani
लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य असून याची उत्पत्ती 17 व्या शताब्दी झाली असल्याचे सांगण्यात येतं. देशात आज सुमारे 5000 डांसर्स आहे ज्या वेगवेळग्या ग्रुप तयार करून आपली प्रस्तुती देतात.
 
मुंबई विद्यापीठामध्ये लोक कला अकादमीचे प्रोफेसर प्रकाश खांडगे म्हणतात की यातून अनेक कोल्हाटी जातीच्या आहे ज्या मुघल काळात बैठकीत मनोरंजनासाठी बोलवल्या जात होत्या.. त्या काळी उत्तर भारतात मुजरा तर दक्षिण भारतात लावणीला बैठकीत नाचला जाणारा डांसचा रूप देण्यात आला होता.
 
आपल्या मामेबहीणीसोबत बेलगावात प्रस्तुती देणार्‍या एका डांसरने सांगितले की वयाच्या 15 व्या वर्षी मला लावणी समूहात घालण्यात आले. माझ्या आईच्या मृत्यूनंतर मी वडिलांना शोधले तर कळले की त्यांचीही मृत्यू झाला होता. ती म्हणते आमच्यात आजी आईची तर आई मुलींची देखभाल करते. माझ्या मुलीचे वडील माझ्या आणि आपल्या मुलींबद्दल सर्व जाणूनदेखील कधी आम्हाला भेटायला येत नाही. मला फार राग येतो. ते आपल्या मुलीसाठी पैसेदेखील पाठवत नाही. माझ्यावर सर्व भार टाकून ते मोकळे झाले. आम्हाला लोकं हेय दृष्टीने बघतात. लावणी देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे. ही कथा आणि कविता नृत्य रूपात प्रस्तुत करण्याची वेगळीच कला आहे तरी आजही लोकं ही कला खुल्या मनाने स्वीकार करत नाही.
 
लावणी करण्यार्‍या डांसर्सला वाटतं की त्यांनी केवळ परंपरा पाळली आहे. परंतू यातून अनेक मुलींना त्यांचे वडील कोण आहे आणि मोठ्या झाल्यावर त्यालाही या परंपरेचा निर्वाह करतील का असा प्रश्न पडतो?Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

दुनियेची टक्कल झाकतात भारतीय केस

मनुष्याच्या केसांचा बाजार हे ऐकण्यात विचित्र वाटतं असलं तरी भारत दुनियेत केसांचा सर्वात ...

news

शेफ देवव्रत जातेगावकर साकारणार मार्जरीनची भव्य 'त्रिमूर्ती'

जेवण बनवणे ही जशी कला आहे, तसेच ते सजवणे, आणि त्यावर काआर्व्हिंग करणे हा देखील शेफच्या ...

news

'नासा' शोधणार गुरुच्या चंद्रावर जीवन

अमेरिकेची अंतराल संस्था नासा गुरुचा चंद्र असलेल्या युरोपावर रोबोटिक लँडर पाठविण्याची ...

news

चष्मा घातल्यास नाही दिसणार चेहरा

मानव आपल्या फायद्यासाठी सतत तरर्‍हेच्या वस्तूंची निर्मिती करत असतो. यामुळे वेळेची बचत ...

Widgets Magazine