विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी विचित्र व भयावह स्वप्ने रोखण्यास मदत मिळू शकते. 'रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप' झोपेची एक रहस्यमयी अवस्था असून त्यात मनुष्य स्वप्न पाहू शकतात. ही अवस्था व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते. मात्र ज्यामागे जे मॅकेनिज आहे, त्याची अद्याप माहिती नाही. जपानच्या रीकेन सेंटर फॉर बायोसिस्टिम्स डायनॅमिक्स रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी जनुकाची ही जोडी शोधली आहे. ती व्यक्ती किती रॅपिड आय मव्हमेंट व किती नॉन रॅपिड आय मुव्हमेंट झोप घेते, हे ठरविण्यास मदत करते. रॅपिड आय मुव्हमेंट स्लीपच्या वेळी आपला मेंदू तेवढा सक्रिय असतो, जेवढा जागेपणी असतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, रॅपिड आय मव्हमेंट स्लीपला प्रभावित करणार्या घटकांची अद्याप कोणतीही माहिती नाही. ज्यावेळी ही जनुके सक्रिय होतात, तेव्हा रॅपिड आय मुव्हमेंट स्लीपमध्ये एकदम घट दिसून आली. आधीच्या अध्ययनातूनही असे दिसून आले आहे की, एसीटिलकोलीन ओळखण्यात आलेला पहिला न्यूरोट्रान्समीटर असून ते ग्रहण करणारे रॅपिड आय मुव्हमेंट स्लीपला कमी वा जास्त करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. एसीटिलकोलीनचा स्राव सस्तन प्राण्यांच्या मेंदूत रॅपिड आय मुव्हमेंट स्लीपवेळी व जागरुक अवस्थेत असतो. मात्र मज्जासंस्थेच्या जटिलतेमुळे कोणची व्यक्ती रॅपिड आय मव्हमेंट स्लीप नियमित करण्यास साहाय्यक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.