शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चेतावणी! पँटच्या खिश्यात मोबाइल ठेवत असाल तर नक्की वाचा

मोबाइलचा वापर सुविधाजनक असला तरी याचे दुष्परिणामही बघायला मिळत आहे. ब्रिटिश फर्टिलिटी एक्सपर्ट्सने एका स्टडीत पुरुषांना मोबाइलच्या सवयीपासून दूर होण्याचा सल्ला दिला आहे. फर्टिलिटी एक्सपर्ट्सने चेतावणी दिली आहे जो व्यक्ती एका दिवसात किमान एक तासही मोबाइल वापरत असले तर त्याचे स्पर्म नष्ट होत आहे आणि स्तर घसरत आहे. एका नवीन संशोधनाप्रमाणे जर आपण मोबाइल अंडकोष किंवा कंबरेच्या खाली ठेवत असाल तर आपल्या स्पर्म लेवल एवढं घसरतं की आपण कल्पनादेखील करू शकत नाही.
 
स्टडीप्रमाणे सामान्य लोकसंख्येत स्पर्मच्या लेवलची समस्या झेलत असलेल्या 11 टक्के लोकांच्या तुलनेत खिश्यात मोबाइल ठेवणार्‍या 47 टक्के लोकं या समस्येमुळे परेशान आहे.
हैफा येथील टेक्निकल यूनिवर्सिटीचे प्रोफेसर मार्टिन डिर्नफेल्ड यांनी म्हटले की, फोन आणि त्याची इलेक्ट्रोमॅग्नेटिक अॅक्टिव्हिटीमुळे स्पर्म प्रभावित होत आहे. संशोधनात कळून आले की अधिकश्या पुरूष आपला मोबाइल आपल्या मांडीजवळ ठेवतात. एवढंच नव्हे तर रात्री मोबाइल चार्ज करताना आपल्या बेडवर ठेवतात. जर आपण आपला मोबाइल बेडजवळच्या टेबलवरही ठेवला तरी स्पर्मची गुणवत्ता प्रभावित होते. ही रिर्पोट जनरल रिप्रोडक्टिव्ह बायोमेडिसिन मध्ये पब्लिश झाली आहे.
 
पश्चिम देशांमध्ये स्पर्मची क्वॉलिटी वाईटपणे प्रभावित झाली असून तेथील 40 टक्के कपल्स गर्भ धारण करण्यासाठी समस्येचा सामना करत आहे.
 
सेंट जॉर्ज हॉस्पिटल लंडनचे प्रोफेसर गेडिस ग्रॉजिंसकस यांनी म्हटले की 'पुरुषांना मोबाइलची वाईट सवय सोडायला हवी. मोबाइलचे वेड असल्यामुळे ते महत्त्वाची गोष्ट गमवू शकतात. जर आपण सूट घालून ऑफिस जात असाल तर आपल्या शर्टच्या खिश्यात मोबाइल ठेवा. याने आपले स्पर्म सुरक्षित राहतील. याव्यतिरिक्त झोपताना मोबाइल बेडवर आपल्या जवळ ठेवून झोपू नका. अनेक लोकं घरातही सतत आपला मोबाइल पायजमा किंवा शॉर्ट्सच्या खिश्यात ठेवतात. खरंच काय मोबाइल आपल्या जीवनाची इतकी महत्त्वाची वस्तू आहे का?

ही आपल्यासाठी चेतावणी आहे की आपली सवय बदला नाही तर वडील होणे अशक्य होईल.