शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (12:59 IST)

तुम्ही लग्न करताय, आधी करार करा!

लग्नाआधी वधू आणि वर यांच्यात लेखी करार असावा, अशी शिफारस महिला आणि बालकल्याण विभागानं केलीय. 
 
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी अशा करारासाठी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशाप्रकारे लग्नाआधी करार करण्यास भारतात मनाई आहे. पण असे करार पाश्चिमात्य देशात सर्रास होताना दिसून येतात. या करारामुळे दोघांचीही जबाबदारी निश्चित करण्यात येते. संपत्तीचे वाटप, जर घटस्फोटाची वेळ आली तर त्यासाठीची तजवीज आधीच करून ठेवण्यात येते.
 
आताच्या परिस्थितीत लग्नानंतर पुरुषांना त्यांच्या संपत्तीतला भाग पत्नीला द्यावा लागतो त्यामुळे पळवाटा शोधण्यात येतात. तर काहीवेळा महिलांकडून अवाजवी मागण्या झाल्याचं पुढे येतं. अनेकवेळा स्त्रियांना घटस्फोट हवा असतो पण पुढच्या आयुष्यातली अनिश्चितता लक्षात घेता त्या संसार पुढे रेटतात. त्यामुळे लग्नाच्या बंधनाला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.