शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मोरांच्या सेक्समुळे गावकर्‍यांची झोप हराम

इंग्लंडमध्ये मोर आणि लांडोर यांच्या सेक्सदरम्यान होणार्‍या हल्ल्यामुळे येथील गावकर्‍यांची झोप हराम झाली आहे. गावकर्‍यांचे म्हणणे आहे की या मोरांनी जगणं दुश्वार केले आहे. ते आमच्या कारवर हल्ला करता आणि आपल्या नख आणि चोचेने गाड्यांवर स्क्रॅच मारतात.
उशॉ मूर गावातील लोकं मागील सहा महिन्यांपासून ही समस्या झेलत आहे. त्यांनी याबाबद डरहम काउंटी काउंसिल येथे तक्रारदेखील दाखल केली आहे. काउंसिल याची तपासणी पर्यावरण संरक्षण कायदा 1990 अंतर्गत करत आहे.
 
काउंसिल या पक्ष्यांद्वारे होत असलेल्या हल्ल्याची चौकशी मानक ध्वनी कसोटीनुरूप करत आहे. हे पक्षी दिवसभर ओरडतात आणि रात्री आमच्या गच्चीवर बसून परेशान करतात असे एका स्थानिक रहिवासी ग्रॅहम ब्रिज यांनी सांगितले.
हे मोर कुठून आले हे स्पष्ट नसून काही लोकांचे म्हणणे आहे की यांची संख्या 30 आहे. स्वयंसेवी संस्था 'द रॉयल सोसाइटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्डस (आरएसपीबी) चे क्रिस कौलैट यांच्याप्रमाणे कायदेशीर या पक्ष्यांबद्दल स्पष्ट किंवा एकमत नाहीये. मोर वन्य पक्षी नसून याला पाळीव पक्षी मानले आहेत परंतु हे असे पाळीव पक्षी आहे ज्यांना मालक नाहीये. यांना कायदेशीर वन्य पक्ष्यांना मिळणारी सुरक्षादेखील नाही.