शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या गावात भारतीय पुरूषांना नो एंट्री

हिमाचल प्रदेशातील निसर्गसौंदर्याने संपन्न अशा कसोल या गावात भारतीय पर्यटकांना राहण्यासाठी बंदी आहे. इतकेच नव्हे तर येथे भारतीय पुरूषांना तर नो एंट्रीच आहे. हा भाग मिनी इस्त्रायल म्हणून ओळखला जातो व येथे इस्त्रायली नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. हे एकूण गांव आपण इस्त्रालयमध्ये आलो असाच फिल देते. येथे भारतीय पर्यटकांना कुणी हॉटेलमालक खोलीच देत नाहीत त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्काम करणे अडचणीचे जाते. अर्थात असा कोणताही कायदा येथे नाही मात्र येथील स्थानिक पर्यटक व्यावसायिकच परदेशी पर्यटकांकडून जास्त कमाई होत असल्याने भारतात असूनही भारतीय पर्यटकांना फारसे एंटरटेन करत नाहीत असे समजते.
 
पर्यटक व्यावसायिकांच्या मते येथे येणार्‍या भारतीय पुरूष पर्यटकांकडून इस्त्रायली महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत व त्यामुळेच येथे भारतीय पुरूषांना नो एंट्री आहे. वीस वर्षापूर्वी या गावातील जमीन कांही इस्त्रायली लोकांनी भाडेकरारावर घेतली व तेथे कॉटेज, कॅफे हाऊस अशी दुकाने सुरू केली. त्यात स्थानिक लोकांना रोजगार दिला त्यामुळे त्यांनी या लोकांना पाठिबा दिला व मिनी इस्त्रायल तयार झाले असे समजते. आजही या गावात मोठमोठे इस्त्रायली झेंडे फडकविले जातात.