शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

लग्नानंतर का वाढतं वजन?

आहारातील बदल आणि फास्ट फूड खाणं यांचा संबंध वजन वाढण्याशी जोडला जातो. मात्र लग्नानंतरही वजन वाढतं, याचा अनुभव अनेकांना आला असेल. यालाच आता एका संशोधनाने देखील दुजोरा दिला आहे.
 
लग्नानंतर अनेक जोडप्यांचं वजन वाढतं. लग्न झाल्यावरच वजन का वाढतं हा प्रश्न देखील अनेकांना सतावतो. राहणीमानात अचानक झालेला बदल हे या मागचं मुख्य कारण आहे, असं स्वित्झर्लंडमधील बेसल विद्यापीठाच्या संशोधनात सांगितलं आहे.
 
का वाढतं वजन?
संशोधनानुसार विवाहित लोक ऑर्गेनिक आणि ट्रेड फुडची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. विवाहित पुरुष आहाराच्या बाबतीत अत्यंत सावध होतात. त्यामुळे जगभरातील विवाहितांचा बीएलआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स जास्त असतो. 
 
विवाह सोहळा ठरल्यानंतर रितीरिवाज पार पडेपर्यंतच वजनात जवळपास 2 किलो वाढ होते, अशी मजेशीर बाबही संशोधनात नमूद करण्यात आली आहे. 
 
युनिव्हर्सिटी ऑफ बेसल आणि दी मॅक्स प्लँक इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट यांनी विवाहित आणि अविवाहितांचा अभ्यास केला. विवाहित लोक अविवाहितांच्या तुलनेत उत्तम आहार घेतात. शिवाय त्यांचे शारिरिक श्रमही कमी होतात. हेच वजन वाढण्यामागचं एक प्रमुख कारण आहे, असं या अभ्यासात दिसून आलं.