शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (12:30 IST)

सावध राहा! सिगारेटपेक्षा उदबत्ती जास्त धोकादायक

प्रत्येक घरात दररोज उदबत्ती लावली जाते आणि त्यातून निघणारी सुगंध घरभर पसरते पण एक संशोधनाप्रमाणे उदबत्तीतून निघणारा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त धोकादायक असतो.
 
साऊथ चीन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे झालेल्या संशोधनाप्रमाणे हा धूर केमिकल डीएनए मध्ये बदल करत असून याने कर्करोगाचा धोका असू शकतो. संशोधकांनुसार उदबत्तीच्या धुराने ब्रेन ट्यूमरचा धोका ही नाकारता येत नाही. 
 
ब्रिटिश लंग फाउंडेशनचे चिकित्सीय सल्लाकार डॉक्टर निक रॉबिन्सन यांनी या संशोधनावर टिप्पणी करत म्हटले की उदबत्तीसह अनेक प्रकाराचे धूर विषारी असू शकतो.
 
तथापि, ते म्हणाले की हे संशोधन लहान उंदरांवर केले होते. अशात याने आरोग्यावर पडणार्‍या परिणाम बाबत काही ठोस प्रमाण नाही.