testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

परप्रांतातील मराठी गुढी!

marathi din
वेबदुनिया|
मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी संस्कृती आणि भाषा टिकविण्यासाठी आंदोलनांचा धुरळा उडालेला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन सुरू केले तरी कधी काळी हाच मुद्दा घेऊन स्थापन झालेली शिवसेनाही आपल्या परीने यात उतरली आहे. मराठी माणसांचा कैवार घेणारे आपणच असे म्हणून हे दोन्ही पक्ष शड्डू ठोकत आहेत.
तिकडे विचारवतांमध्येही वैचारीक धुरळा उडाला आहे. आंदोलनातील हिंसाचार चुकीचा पण त्यातील मुद्दे बरोबर यापासून ते अगदी आजच्या कॉस्मोपॉलिटिन जगात अशा प्रकारचा प्रांतीयवाद जोपासणे चुकीचे अशा प्रतिक्रिया मराठी भाषकांकडूनच व्यक्त होत आहेत. त्याचवेळी हिंदी मीडीया तर या सगळ्या प्रकाराच्या विरोधातच आहे. हे सगळे होत असताना महाराष्ट्राबाहेर रहाणार्‍या मराठी भाषकांत मात्र बरीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील आंदोलनांचा आपल्यावरही काही परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी काही प्रमाणात वाटत आहे.

महाराष्ट्रात मराठी संस्कृती, भाषा टिकविण्याच्या बाबतीत वैचारीक आणि रस्त्यावरची आंदोलने होत असताना परप्रांतात रहाणार्‍या मराठी मंडळींची स्थिती काय आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे होते. बरीच वर्षे महाराष्ट्राबाहेर राहूनही ही मंडळी 'मराठी' म्हणून उरली आहेत काय? मुख्य म्हणजे परप्रांतात, परभाषेच्या सावलीखाली राहूनही ते स्वतःची भाषा टिकवतात का? त्यांची पुढची पिढी मराठी बोलते का? मराठी सण, संस्कृती त्यांनी कितपत टिकवली आहे? आणि मुंबई व महाराष्ट्रात उसळलेल्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलनाकडे ती कोणत्या नजरेने पहातात? त्याचवेळी म्हणून त्यांना स्वतःला काही त्रास झाला का? दुय्यमत्वाची वागणूक मिळाली का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न वेबदुनियाने केला. यासंदर्भात इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा आणि हरिद्वार येथे रहाणार्‍या मराठी भाषकांना वेबदुनियाने लिहिते केले. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी खालील दुव्यांवर टिचकी मारा. या विषयावर आपणही आपली मते खाली दिलेल्या चौकटीत व्यक्त करू शकता.

गंगेच्या काठावर मराठीचा मळा

माळव्यातील मराठी

शेठजीच्या राज्यातील मराठी

ग्वालियरचं मराठी जगत


यावर अधिक वाचा :

माझा शहरासाठी उपयोग करून घ्या – आयुक्त तुकाराम मुंढे

national news
इथे आहे तोवर माझा उपयोग करून घ्या आपण शहर योग्य पद्धतीने सुधारित करू. पुणे येतील नागरिक ...

आता दर शुक्रवारी दुधाचे भाव ठरणार

national news
आता सहकारी दूध संघांनी दुधाचा दर कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ...

अल्जिरिया : आल्या परीक्षा, देशात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

national news
अल्जिरियात शाळाशाळांमधून डिप्लोमाच्या परीक्षा सुरू झाल्यात. त्यामुळे या काळात कॉपी ...

निलम गोऱ्हे यांच्या घरी निघाला विषारी साप

national news
शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील घरात सकाळी 5 च्या ...

​'ड्राय डे'च्या कलाकारांनी दिला 'डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह' ...

national news
आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, ...

या फोनची किंमत आहे 22,999 रुपये, मिळू शकतो फक्त 6,999 ...

national news
Motorolaच्या Moto X4 फोनवर Flipkart सेलमध्ये डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट फार जास्त ...

मोबाईल बदला, अपडेट करा, अन्यथा व्हॉट्सअॅप चालणार नाही

national news
या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 ...

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील ...

national news
कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...